नोरा फतेही सारखी फिगर हवी म्हणून बायकोला तासंतास करायला लावली जीम.... बायकोचे झाले हे हाल

      उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादनगर येथील महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नोरा फतेही सारखी फिगर हवी म्हणून तिचा नवरा तिला 3 तास जीम मध्ये कसरत करायला लावत होता. संबंधित महिलेचा नवरा हा शारीरिक शिक्षणाचा शिक्षक आहे. तो बायकोला तिच्या शरीरयष्टी वरून रोज टोमणे देयचा. नोरा सारखी आकर्षक फिगर बनवण्यासाठी तो तिला जेवण न देता जीम करण्यासाठी भाग पाडत होता. 
      टीओआयच्या वृत्तानुसार , महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की तिचा नवरा म्हणायचा, 'माझ्याशी लग्न करून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मला नोरा फतेहीसारखी सुंदर मुलगी मिळू शकली असती. सतत टोमणे देत तो तिचा तिरस्कार करायचा. तो तिच्यावर व्यायामासाठी दबाव आणत होता जर महिलेने व्यायाम कमी केला तर तिला तो जेवणही देयचा नाही.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software