MPSC ची मोठी घोषणा! १,५३९ तलाठी पदांसह ५,७०७ जागांसाठी महाभरती सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC गट-क परीक्षा २०२६ अंतर्गत ५,७०७ जागांची महाभरती! १,५३९ तलाठी आणि ४८० लिपिक पदांचा समावेश. ऑनलाईन अर्जासाठी ५ ऑगस्ट २०२६ ही शेवटची तारीख.

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या अंतर्गत पदांच्या संख्येत मोठी वाढ करत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने नव्याने तब्बल ३,०८८ पदांचा समावेश केल्यामुळे ही भरती प्रक्रिया आता एकूण ५,७०७ जागांसाठी पार पडणार आहे. यामध्ये महसूल विभागांतर्गत १,५३९ तलाठी आणि ४८० लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पदांचा समावेश असून, इच्छुकांना आता ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

या मेगाभरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना पे-मॅट्रिक्स एस-८ नुसार २५,५०० ते ८१,१० रुपये यादरम्यान आकर्षक वेतनश्रेणी मिळणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केलेले, मराठी भाषेचे ज्ञान असणारे आणि संगणक हाताळणीचे कौशल्य असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. लिपिक-टंकलेखक या पदासाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. १८ ते ३८ वर्षे वयोमर्यादा असणाऱ्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार असून शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत लागू असेल.

उमेदवारांची वाढती संख्या आणि मागणी विचारात घेऊन अर्ज सादर करण्यासाठी ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंतची अंतिम मुदत असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रशासकीय विभागांमध्ये या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. राज्यभरातील हजारो पदवीधर तरुणांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात असून, उमेदवारांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा

Latest News

पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा
पुण्यात पाणीकपातीचे संकट टळले! खडकवासला धरणसाखळीत दमदार पाऊस झाल्याने २० टीएमसी साठा जमा; पुणे महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा सुरू.
"शनिवारी दुपारी ३:३० वाजेपर्यंत वेळ..."; शिक्षकमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी CJP चा सरकारला अंतिम इशारा
माण तालुक्यातील शाळा वाऱ्यावर; शिक्षण विभागाच्या भूमिकेवर पालक नाराज
माण तालुक्यातील मनकर्णवाडीचे पोलीस पाटील रमेश गेंड यांचे अपघाती निधन
२६ जुलैला जंतर-मंतरवर आंदोलकांना चोपणार!" हिंदू रक्षा दलाची उघड धमकी; दिल्लीत खळबळ

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software