सातारा जिल्हा बँक निवडणूक ठरावावरून मालखेड सोसायटीत कोयता हल्ला! चेअरमन अन् सदस्याला मारहाण

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक ठरावावरून कराडमधील मालखेड सोसायटीत धुमश्चक्री! चेअरमनला मारहाण, सदस्यावर कोयत्याने हल्ला. दोन भावांवर गुन्हा दाखल.

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रतिनिधी निवडीच्या ठरावावरून कराड तालुक्यातील मालखेड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत भीषण वाद उफाळून आला आहे. या राजकीय वादातून सोसायटीच्या चेअरमनला धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली, तर भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका सदस्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालखेड सेवा सोसायटीच्या कार्यालयात जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाजीराव माने या सदस्याने स्वतःच्या नावाचा ठराव मांडण्याचा हट्ट धरला. मात्र, बहुतांश सदस्यांनी त्यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शवत हौसेराव लोकरे यांच्या नावाला पसंती दिली. या निर्णयामुळे संतापलेल्या बाजीराव माने याने बैठकीत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून बाहेर थांबलेला त्याचा भाऊ सर्जेराव माने याने आत घुसून सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय माने यांना अचानक पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर इतर सदस्यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला आणि सर्वजण सोसायटीबाहेर रस्त्यावर बोलत उभे राहिले. याच दरम्यान दोन्ही संशयित आरोपी पुन्हा तिथे आले आणि सर्जेराव माने याने हातातील कोयत्याने अशोक माने यांच्यावर वार केला. हा वार अशोक माने यांच्या डाव्या हातावर बसल्याने ते गंभीर जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी रणजित माने यांनाही बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी कोयता तिथेच फेकून पलायन केले. याप्रकरणी बाजीराव माने आणि सर्जेराव माने या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा

Latest News

पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा
पुण्यात पाणीकपातीचे संकट टळले! खडकवासला धरणसाखळीत दमदार पाऊस झाल्याने २० टीएमसी साठा जमा; पुणे महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा सुरू.
"शनिवारी दुपारी ३:३० वाजेपर्यंत वेळ..."; शिक्षकमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी CJP चा सरकारला अंतिम इशारा
माण तालुक्यातील शाळा वाऱ्यावर; शिक्षण विभागाच्या भूमिकेवर पालक नाराज
माण तालुक्यातील मनकर्णवाडीचे पोलीस पाटील रमेश गेंड यांचे अपघाती निधन
२६ जुलैला जंतर-मंतरवर आंदोलकांना चोपणार!" हिंदू रक्षा दलाची उघड धमकी; दिल्लीत खळबळ

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software