माण तालुक्यातील मनकर्णवाडीचे पोलीस पाटील रमेश गेंड यांचे अपघाती निधन

माण तालुक्यातील मनकर्णवाडीचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील रमेश गेंड (वय ४२) यांचे पळशीजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात निधन. संपूर्ण तालुक्यात हळहळ.

दहिवडी: माण तालुक्यातील मनकर्णवाडी येथील पोलीस पाटील रमेश किसन गेंड (वय ४२) यांचे शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. कामानिमित्त पळशीकडे जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या अचानक निधनाने मनकर्णवाडीसह संपूर्ण माण तालुक्यात तसेच पोलीस पाटील संघटनेत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गेंड हे शुक्रवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून पळशीकडे जात होते. मौजे पळशी (ता. माण) हद्दीतील माळवेवस्ती येथील नवीन घराच्या बांधकामाजवळ समोरून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

रमेश गेंड यांनी अनेक वर्षे पोलीस पाटील म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने कार्य केले होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तसेच समाजातील सर्व घटकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे ते सर्वांचे लाडके होते. त्यांच्या निधनामुळे गेंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण माण तालुक्याने एक कर्तव्यदक्ष, जनप्रिय आणि सेवाभावी पोलीस पाटील गमावल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा

Latest News

पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा पाणीकपातीचे संकट दूर! खडकवासला प्रकल्पात दमदार जलसाठा; पुणे शहरात सुरळीत पाणीपुरवठा
पुण्यात पाणीकपातीचे संकट टळले! खडकवासला धरणसाखळीत दमदार पाऊस झाल्याने २० टीएमसी साठा जमा; पुणे महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा सुरू.
"शनिवारी दुपारी ३:३० वाजेपर्यंत वेळ..."; शिक्षकमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी CJP चा सरकारला अंतिम इशारा
माण तालुक्यातील शाळा वाऱ्यावर; शिक्षण विभागाच्या भूमिकेवर पालक नाराज
माण तालुक्यातील मनकर्णवाडीचे पोलीस पाटील रमेश गेंड यांचे अपघाती निधन
२६ जुलैला जंतर-मंतरवर आंदोलकांना चोपणार!" हिंदू रक्षा दलाची उघड धमकी; दिल्लीत खळबळ

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software