वर्षा'वरील जयंत पाटील यांच्या भेटीमागे राजकीय संकेत? राष्ट्रवादी नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना वेग आला आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी चालना मिळाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, आमचे नेते वर्षावर अर्थखात्याशी संबंधित विषयासाठी गेले असतील, असे आपण गृहित धरू शकतो. मात्र जयंत पाटील वर्षावर गेले म्हणजे राजकारणात काहीतरी वेगळी घडामोड सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढे बोलताना त्यांनी पक्षातील सर्व निर्णय आणि घडामोडींची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला असतेच असे नाही, असेही स्पष्ट केले. वरिष्ठ स्तरावर अनेक घडामोडी सुरू असतात आणि त्याची संपूर्ण माहिती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसल्याने राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या भेटीचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणावर उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दहिवडीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडक अभियान; शेतजमिनींचे वादही सामोपचाराने निकाली

Latest News

दहिवडीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडक अभियान; शेतजमिनींचे वादही सामोपचाराने निकाली दहिवडीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडक अभियान; शेतजमिनींचे वादही सामोपचाराने निकाली
दहिवडी:दहिवडी परिसरात गेल्या काही काळापासून विविध अवैध धंद्यांमुळे चर्चेत होता. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी येथील पदभार स्वीकारल्यानंतर...
शिंगणापूरमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; २१ बाटल्या जप्त, एकावर गुन्हा
कोयना धरणातील पाण्याची आवक थांबली; सांगलीत कृष्णा नदीची पातळी ९ फुटांवर, पुन्हा वाढली चिंता
पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू
अनधिकृत बांधकामामुळे पुण्यातील १० नवनिर्वाचित नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software