१७ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार 'पॅडी' म्हस्केला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने एक मोठी कारवाई करत मांजरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के (वय २२, रा. पर्वती पायथा, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्यासह शरीराविरुद्धचे तब्बल १७ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते आणि फरार आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना त्यांच्या खात्रीशीर बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. मांजरी पोलीस स्टेशन येथे शस्त्र कायद्यानुसार (शस्त्र अधिनियम ३ (२५)) दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला फरार आरोपी प्रथम उर्फ पॅडी म्हस्के हा पर्वती परिसरातील निलायम टॉकीजजवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या बातमीची गांभीर्याने दखल घेत, गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले. मिळालेल्या आदेशानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि त्यांच्या पथकाने निलायम टॉकीज परिसरात सापळा रचला. संशयास्पद स्थितीत वावरत असलेल्या पॅडी म्हस्केला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव आणि पत्ता सांगितला. यानंतर मांजरी पोलिसांशी संपर्क साधून खात्री केली असता, तो याच गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले, ज्यानंतर त्याला मांजरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री गौहर हसन, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच अंमलदार संदीप शिर्के, विशाल दळवी, ऋषिकेश व्यवहारे, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे आणि विद्या शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला  सातारा एलसीबीने कसे पकडले?

Latest News

कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला  सातारा एलसीबीने कसे पकडले? कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला सातारा एलसीबीने कसे पकडले?
सातारा: कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल (अभिवचन) रजेवर बाहेर पडल्यानंतर तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन वेशांतर करत फिरणाऱ्या एका अट्टल...
पुण्यात ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई
१७ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार 'पॅडी' म्हस्केला पुणे पोलिसांकडून अटक
साताऱ्यात शाहू जयंतीनिमित्त 'समता दिंडी'; शासकीय योजनांचा फलकांद्वारे जागर
 "महावितरणच्या हलगर्जीपणाचा दुहेरी बळी; विजेच्या धक्क्याने आजी-नातवाचा जागीच मृत्यू"

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software