सातारा पोलिसांची धडक कारवाई: ४ चोरीच्या दुचाकींसह सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या; वाढे फाट्यावर थरारक पाठलाग!

सातारा:

सातारा शहर आणि परिसरात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच, सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून तब्बल ४ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

युवराज आकोबा निकम (वय ५६, रा. पिंपोडे बु।। ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

वाढे फाटा परिसरात पोलिसांचा सापळा

शहरातील वाढत्या वाहन चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला विशेष शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. दरम्यान, एक संशयित इसम विनानंबरच्या दुचाकीवरून वाढे फाटा परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

डी.बी. पथकाने तात्काळ कारवाई करत वाढे फाटा येथे सदर संशयिताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील विनानंबरच्या गाडीबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ती गाडी चोरीची असल्याचे मान्य केले.

तपासात आणखी ३ चोऱ्या उघड

आरोपी युवराज निकम याची पोलिसांनी सखोल चौकशी केली. यामध्ये त्याने सातारा शहर आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ३ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे:

  • हिरो होंडा स्प्लेंडर (MH 11 CP 7364) – सातारा शहर पो.स्टे. गु.रं. ५४६/२०२६

  • होंडा शाईन (MH 11 CU 2299) – सातारा शहर पो.स्टे. गु.रं. २२१/२०२६

  • हिरो एच.एफ. डिलक्स (MH 11 AS 4549) – बोरगाव पो.स्टे. गु.रं. ३४७/२०२५

  • हिरो एच.एफ. डिलक्स (MH 11 AJ 7108) – तपासादरम्यान जप्त

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस अंमलदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, विकास मोरे, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, ऋषिकेश डोळस आणि सचिन आदमाने यांनी केली आहे.WhatsApp Image 2026-07-03 at 19.16.10

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

Latest News

विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
    पुणे: पुण्यातील विमाननगर भागात एका प्रसिद्ध चायनीज सेंटरवर महिन्याला ५ हजार रुपयांची खंडणी (हप्ता) मागून, ती न दिल्याने एका
सातारा पोलिसांची धडक कारवाई: ४ चोरीच्या दुचाकींसह सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या; वाढे फाट्यावर थरारक पाठलाग!
कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला सातारा एलसीबीने कसे पकडले?
पुण्यात ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई
१७ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार 'पॅडी' म्हस्केला पुणे पोलिसांकडून अटक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software