गणेशोत्सवाच्या गर्दीत योजनांचा जागर; ‘लोकसंवाद’ अभियानाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान जनसंपर्क विभागाचे ‘लोकसंवाद’ अभियान. २९ सप्टेंबरला राज्यभरात ८०० रोजगार मेळाव्यांची घोषणा व नशामुक्त महाराष्ट्राची शपथ.

मुंबई: गणेशोत्सवाच्या मंगलमय आणि चैतन्यमय वातावरणात संस्कृतीच्या सेलिब्रेशनसोबतच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या सुवर्णसंधी आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ अभियानाला मुंबईत अभूतपूर्व आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागातील चिंचपोकळी, लालबाग आणि भायखळा परिसरातील प्रतिष्ठित व लोकप्रिय गणेश मंडळांच्या प्रांगणात या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले. याद्वारे विविध शासकीय विभागांच्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत नागरिकांच्या अडीअडचणी व शंकांचे जागेवरच निरसन करण्यात आल्यामुळे हा उपक्रम पर्वणी ठरला आहे.

       या सर्वसमावेशक अभियानांतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग तसेच ‘नशामुक्त महाराष्ट्र’ आणि ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचे विविध उपक्रम गणेशभक्तांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत ओबीसी घटकांसाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अर्थसहाय्यक व शैक्षणिक योजनांची माहिती विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक आणि विभागीय माहिती अधिकारी धोंडिराम अर्जुन यांनी अत्यंत सविस्तरपणे दिली, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल. याशिवाय, राज्यातील युवकांना रोजगाराच्या हक्काच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास विभागामार्फत आगामी २९ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी तब्बल ८०० भव्य रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. ‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यां’च्या माध्यमातून मुंबईत १० वेगवेगळ्या ठिकाणी हे मेळावे पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी व तरुणांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय संपर्क अधिकारी काशिबाई थोरात यांनी केले.

        या अभियानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला तो म्हणजे ‘नशामुक्त महाराष्ट्र’ व अमली पदार्थविरोधी जनजागृतीचा संदेश. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला नशामुक्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी गृह विभाग आणि मुंबई पोलिसांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मोहिमेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक किरण वाघ, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद जाधव, वरिष्ठ सहायक संचालक दत्तात्रय कोकरे आणि विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करत नशेच्या घातक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थितांनी नशामुक्त महाराष्ट्राची शपथ घेत जोरदार घोषणाबाजी केली.

      चिंचपोकळीतील प्रसिद्ध चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजन डिचवलकर, उपाध्यक्ष प्रणील पांचाळ, रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मंगेश पिपरकर, कार्याध्यक्ष रोहन सावंत, सरचिटणीस राकेश जेजुरकर, खजिनदार शंकर साळवी यांच्यासह लालबागच्या बाल युवक उत्सव मंडळ तेजुकायाचे अध्यक्ष उपेंद्र सावंत, कार्याध्यक्ष प्रभाकर हडकर, चिटणीस गीतेश गवस, खजिनदार मनोहर बटवाल तसेच राजा तेजुकायाचे अध्यक्ष राजेंद्र सातार्डेकर, उपाध्यक्ष अमित वालगुडे, खजिनदार अमोल भाबड आणि उपखजिनदार अमोल सावंत यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व शेकडो गणेशभक्तांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. लोकसंवाद अभियानादरम्यान नागरिकांनी विविध शासकीय योजनांच्या अर्जाची प्रक्रिया, लाभाचे स्वरूप आणि आवश्यक कागद पत्रांबाबत विचारलेल्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी समाधानकारक निरसन केले. गणेशोत्सवा सारख्या सार्वजनिक उत्सवाचा योग साधून जनहिताच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळात कौतुकाचा विषय ठरला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन

Latest News

सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या तोंडावर खा. उदयनराजे भोसले यांचे 'सहकारात राजकारण नको' म्हणत शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन....
पुणे महापालिकेची धडक कारवाई; लोहगावातील ११ पीजी-हॉस्टेल सील
‘तुमच्यासाठी स्टार असतील, माझ्यासाठी जाहिरातदार’; पान मसाला जाहिरात प्रकरणी तुकाराम मुंढेंची रोखठोक भूमिका
उरुळी कांचनजवळ अज्ञात वाहनाची धडक; सहाय्यक फौजदाराचा दुर्दैवी मृत्यू
उजनी धरणातील मासेमारी ठेकेदारीला स्थगिती; पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणाला यश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software