राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन. भारताचा विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पट, ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी.

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण केले. जगातील विविध देशांमध्ये सुरू असलेली युद्धे आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वांत वेगाने प्रगती करत असून, आपली विकास दर (GDP Growth Rate) जागतिक सरासरीच्या दुप्पट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या या संबोधनात देशाची संरक्षण सज्जता, मजबूत अर्थव्यवस्था, सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत घेतलेल्या कठोर निर्णयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

        संबोधनाच्या सुरुवातीला देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना राष्ट्रपतींनी देशाचे रक्षण करणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांच्या, निमलष्करी दलांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठा व शौर्याचा गौरव केला. तसेच, परदेशातील भारतीय दूतावासांत कार्यरत नागरिक आणि जागतिक पातळीवर भारताचा मान उंचावणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे त्यांनी कौतुक केले. आजच्या नव्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे स्वातंत्र्य व समान संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

      देशाच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करताना राष्ट्रपतींनी नमूद केले की, जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आर्थिक संकटामुळे मंदीचे वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आगेकूच करत आहे. जगातील ५० टक्क्यांहून अधिक रिअल-टाइम डिजिटल व्यवहार (Real-time Digital Transactions) एकट्या भारतात होत आहेत, ही आपल्या डिजिटल क्रांतीची मोठी पावती आहे. याशिवाय, देशातील न्यायिक यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, कोणत्याही नागरिकाला संसाधनांच्या किंवा आर्थिक अभावामुळे न्यायापासून वंचित राहावे लागणार नाही.

             राष्ट्रीय सुरक्षा आणि शेतकरी हिताच्या मुद्यांवर बोलताना राष्ट्रपतींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख केला. भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी नेटवर्कवर अचूक हल्ले करण्याची आपली अफाट क्षमता या ऑपरेशने सिद्ध करून दाखवली आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना जगात कुठेही लपले तरी त्याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. विशेषतःदहशतवादास पाठीशी घालणाऱ्या देशासोबत ‘सिंधू जल करार’ (Indus Waters Treaty) निलंबित करण्याचा निर्णय पूर्णपणे राष्ट्रहिताचा असून, देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांच्या हितासाठी हा एक अत्यंत निर्णायक पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     स्वातंत्र्यदिन २०२६ च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सुरक्षा दलांच्या जवानांच्या शौर्यास सलाम करत एकूण ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये १३ मरणोपरांत पुरस्कारांचाही समावेश आहे. देशातील गरीब घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रमामुळे ८० कोटींहून अधिक नागरिकांसाठी भक्कम खाद्य सुरक्षा निर्माण झाली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत ३ कोटी ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या गाठल्यानंतर, देश आता आणखी ३ कोटी नवीन लखपती दीदी घडवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारताने आपल्या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि सकारात्मक आर्थिक धोरणांमुळे जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण केला असून, एकेकाळी सीमित असणारी भारताची अर्थव्यवस्था आज जागतिक पटलावर अत्यंत बलशाली ठरत असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत

Latest News

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन. भारताचा विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पट, ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी.
इस्रो अभ्यास दौरा पूर्ण करून ४१ विद्यार्थी नागपुरात दाखल; पालकमंत्र्यांनी साधला संवाद
शौर्य आणि सेवेला सलाम; महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी
पुण्यात लक्ष्मण हाके-नवनाथ वाघमारे आक्रमक; सरकारच्या भूमिकेवर नाराजी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software