साताऱ्यात भाजपचे ‘सेवा अभियान’ यशस्वी; प्रलंबित प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा

साताऱ्यात भाजपचे 'सेवा अभियान' यशस्वी पार पडले. संतोष साखरे व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी.

सातारा: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभरात राबविण्यात येत असलेल्यासेवा अभियान’ या अभिनव उपक्रमाने सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त व यशस्वी प्रतिसाद मिळवला आहे. सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेली कामे व अडकलेली प्रकरणे वेळेत मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असून, यामुळे नागरिकांच्या समस्यांना थेट प्रशासकीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

        सातारा येथे पार पडलेल्या या विशेष अभियाना दरम्यान प्रदेशाध्यक्षांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विविध शासकीय कामांसंदर्भातील निवेदने स्वीकारली. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी मांडलेल्या अडचणी, प्रलंबित प्रकरणे आणि शासकीय अनास्थेमुळे रखडलेली कामे यांची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये तातडीने प्रशासकीय हस्तक्षेपाची आवश्यकता होती, तिथे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधत नियमांच्या चौकटीत राहून कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या.

          केवळ स्थानिक पातळीवरील प्रश्नच नव्हे, तर ज्या प्रकरणांमध्ये शासनस्तरावर धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता असते, अशा गंभीर विषयांचाही प्रभावी पाठपुरावा या अभियानाद्वारे केला जाणार आहे. अशा सर्व निवेदनांवर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे विशेष शिफारस पत्र जोडून ते संबंधित मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच आवश्यक त्या उच्चस्तरीय शासकीय विभागांकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या पद्धतीमुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य व उच्चस्तरीय शासनस्तरीय व्यासपीठ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

       सेवा अभियान’च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती किंवा राजकीय प्रचारापुरती मर्यादित संघटना नसून, सामान्य माणसाच्या अडी अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे, हा संदेश पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. नागरिकांच्या समस्या थेट संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची ही नवीन कार्यसंस्कृती निश्चितच कौतुkaस्पद ठरत असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

      सातारा येथे संपन्न झालेल्या या महत्त्वाच्या उपक्रमाप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, आमदार धैर्यशील कदम, सुनिलतात्या काटकर, जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले, राहुल शिवनामे, सोशल मीडिया प्रदेश सदस्य रविंद्र लाहोटी, प्रा. डॉ. पी. बी. रोंगे, मंडल अध्यक्ष नंदकुमार सुर्वे, मारुती चिकणे, वैशाली टंगसाळे, अविनाश खर्शीकर, गणेश सुतार, संदीप परामणे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष जयंत माने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमारे, श्रीहरी गोळे, धनाजी माने पाटील, स्वप्नील पाटील, प्रशांत चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत

Latest News

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन. भारताचा विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पट, ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी.
इस्रो अभ्यास दौरा पूर्ण करून ४१ विद्यार्थी नागपुरात दाखल; पालकमंत्र्यांनी साधला संवाद
शौर्य आणि सेवेला सलाम; महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी
पुण्यात लक्ष्मण हाके-नवनाथ वाघमारे आक्रमक; सरकारच्या भूमिकेवर नाराजी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software