हजारो विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा परीक्षा देण्याची संधी

लोक प्रांत इम्पॅक्ट

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल-मे 2026 च्या द्वितीय सेमिस्टर परीक्षेसाठी फॉर्म भरताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आणि परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते. यामुळे त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

 

मात्र, लोक प्रांतच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे.

 

या संदर्भात परीक्षा संचालक प्रा. प्रभाकर देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तारखा आधीच पार पडल्या आहेत, त्यांच्यासाठीही पुन्हा परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार

 

प्रा. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले की,

 

“विद्यापीठ एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तारखा होऊन गेल्या आहेत, त्यांनाही पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल.”

 

या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचणार असून, विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेतल्याने लोक प्रांतच्या बातमीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

लाच प्रकरणात कारवाई;  लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

Latest News

लाच प्रकरणात कारवाई;  लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले लाच प्रकरणात कारवाई; लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून काम...
हजारो विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा परीक्षा देण्याची संधी
माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाकडून आश्वासन
पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software