लाच प्रकरणात कारवाई; लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून सुमारे ₹70,000 ते ₹80,000 इतकी लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत ACB कडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि दिनांक 1 मे 2026 रोजी कारवाई करत आरोपी मनोज बरोटे (पोलीस उप निरीक्षक लोहगाव पोलीस स्टेशन ) लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

लाच प्रकरणात कारवाई;  लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

Latest News

लाच प्रकरणात कारवाई;  लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले लाच प्रकरणात कारवाई; लोहगाव मध्ये अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून काम...
हजारो विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा परीक्षा देण्याची संधी
माणदेशात रंगणार 'शिवराज्याभिषेक' सोहळ्याचा अभूतपूर्व सोहळा ; २५ आणि २६ एप्रिल रोजी सादरीकरण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाकडून आश्वासन
पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software