पुण्यात भारतीय लष्कराची अग्निवीर भरती; १० ते १२ ऑगस्ट रोजी मेळावा

पुण्यातील BEG खडकी येथे १० ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन. GD, टेक्निकल, ट्रेड्समन आणि खेळाडूंसाठी सुवर्णसंधी.

पुणे:भारतीय लष्करात (Indian Army) देशसेवा करण्याची इच्छा बाळगून असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे येथील प्रसिद्ध ‘बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र’ (BEG), खडकी येथे युनिट मुख्यालय कोटा (Unit Headquarters Quota) अंतर्गत ‘अग्निवीर भरती मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. आगामी १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा भरती मेळावा पार पडणार असून, याद्वारे अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, ट्रेड्समन (८वी व १०वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

लष्कर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, ३१ जुलै २०२६ रोजी सर्वप्रथम पात्र खेळाडूंची प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला १० ऑगस्टपासून सुरुवात होईल. १० ऑगस्ट रोजी अग्निवीर सामान्य कर्तव्य (मराठा प्रवर्ग) पदासाठी भरती होईल. ११ ऑगस्ट रोजी अग्निवीर सामान्य कर्तव्य (शीख - मजहबी व रामदासी, एम अँड आर तसेच मुस्लिम प्रवर्ग), अग्निवीर स्टोअर कीपर/ऑफिस असिस्टंट, अग्निवीर ट्रेड्समन (८वी व १०वी उत्तीर्ण) आणि विविध सपोर्ट स्टाफ पदांसाठी प्रक्रिया पार पडेल. तर १२ ऑगस्ट रोजी अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) पदासाठी भरती होणार आहे.

भरती प्रक्रियेचे ठिकाण आणि वेळ:

या भरती प्रक्रियेदरम्यान सहभागी होणाऱ्या उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (Physical Fitness), शारीरिक मापन, कागदपत्रांची पडताळणी तसेच संगणक नोंदणी केली जाणार आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ठरलेल्या दिवशी सकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत नंदा गेट, बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी, पुणे’ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सकाळी ८:०० वाजल्यानंतर कोणत्याही नवीन उमेदवारास आत प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

खेळाडूंसाठी कोणकोणत्या खेळांना संधी?

अग्निवीर खेळाडू (खुला वर्ग) भरतीसाठी फुटबॉल, पोहणे, हॉकी, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, कुस्ती, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्स आदी विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या तरुणांना यामध्ये सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, सेवा अटी आणि इतर आवश्यक तपशीलांसाठी उमेदवारांनी www.bsakirkee.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (निवृत्त) यांनी केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

Latest News

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची सुरुवात. drugfreemumbai.org वर नशामुक्तीची शपथ घेऊन मिळवा प्रमाणपत्र.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय नव्या पत्त्यावर; एअर इंडिया इमारत बनणार राज्याचे नवे प्रशासकीय केंद्र
पुण्यात रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता; पहिल्या दीड किमीसाठी २५ ऐवजी ३० रुपये प्रस्तावित
पुण्यात वाहन क्रमांकात मोठा बदल; 'MH-12' मालिका संपण्याच्या मार्गावर
दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कवर ईडीचा मोठा प्रहार; सलीम डोलाच्या पंटरसह १० जणांविरोधात आरोपपत्र

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software