- Hindi News
- पुणे
- लोहगावात शनी जयंती आणि अमावास्येचा दुहेरी योग; भाविकांनी स्वयंशिस्त राखत घेतले दर्शन
लोहगावात शनी जयंती आणि अमावास्येचा दुहेरी योग; भाविकांनी स्वयंशिस्त राखत घेतले दर्शन
लोहगाव: आज शनी जयंती आणि शनी अमावास्या हा अत्यंत पवित्र दुहेरी योग एकाच दिवशी आल्यामुळे, लोहगाव येथील शनी मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. या विशेष पर्वणीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी स्वतःच कमालीची स्वयंशिस्त दाखवत रस्त्यापर्यंत लांबच लांब रांगा लावल्या आणि अत्यंत शांततेत दर्शनाचा लाभ घेत हा उत्सव साजरा केला.
.jpg)
सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. शनी जयंती आणि अमावास्येच्या या दुर्मिळ योगाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी बाहेर पडले होते. मंदिरात शनी देवाच्या मूर्तीवर नेहमीप्रमाणे अभिषेक आणि धार्मिक विधी पार पडले.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी स्वतःहून मोठा समजूतदारपणा दाखवला. रस्त्यावरून थेट मंदिरापर्यंत प्रत्येकाने रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले, ज्यामुळे कुठेही गोंधळ उडाला नाही. शनी देवाच्या दर्शनाने शनी दोषांचे निवारण होते या श्रद्धेने रात्री उशिरापर्यंत भाविकांची मंदिरात दर्शनासाठी रीघ लागली होती. साधेपणा आणि भक्तीभावाच्या वातावरणात भाविकांनी हा दुहेरी उत्सव साजरा केला.
