- Hindi News
- पुणे
- पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १७ जानेवारी रोजी
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १७ जानेवारी रोजी
By Lokprant
On

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बंडगार्डन रोड, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी २ हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

Latest News
24 May 2025 18:40:19
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील शाहबाद एसडीएम कॉलनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास एका घराच्या पायरीखालून अचानक