२०३६ ऑलिम्पिकसाठी मोठी तयारी; भारताला क्रीडा महाशक्ती बनवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

खेलो इंडिया डायलॉग २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांशी संवाद. २०३६ ऑलिम्पिक तयारी व नशामुक्त भारतासाठी आयआयटी मुंबईत विशेष सोहळा.

मुंबई: राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया डायलॉग २०२६’च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण वर्गाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत क्रीडा संस्कृतीच्या प्रसारावर आणि शारीरिक तंदुरुस्तीवर विशेष भर दिला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे मुंबईतील मुख्य आयोजन प्रतिष्ठित अशा आयआयटी मुंबईच्या पी.सी. सक्सेना सभागृहात पार पडले. आयआयटी मुंबई आणि ‘माय भारत मुंबई’ यांच्या समन्वयाने झालेल्या या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी आणि युवकांनी अत्यंत उत्साहात व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या संवादादरम्यान पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा विश्वाला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण भूमिका मांडताना आगामी २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी देशवासीयांना, विशेषतः युवकांना मोठ्या प्रमाणावर क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

       या उच्चस्तरीय कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आंतरराष्ट्रीय ख्यातीची हेप्टॅथलॉनपटू नंदिनी अगासरा, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, ‘माय भारत महाराष्ट्राचे’ राज्य संचालक अमित पुंडे आणि ‘माय भारत मुंबई’चे उपसंचालक अनुप इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये क्रीडा आणि शारीरिक व्यायामाला अनन्य साधारण महत्त्व देण्याचे आवाहन केले. देशातील क्रीडा परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि भारतात तळागाळापासून एक मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत निर्णायक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उच्चस्तरीय संवादामुळे देशातील युवकांना भारताला जागतिक स्तरावरील एक सशक्त क्रीडा राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या केंद्र सरकारच्या दूरदृष्टीची सखोल माहिती मिळाली.

        पंतप्रधानांच्या संवादा नंतर आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रश्नोत्तर सत्रात आंतरराष्ट्रीय हेप्टॅथलॉनपटू नंदिनी अगासरा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या प्रेरणादायी क्रीडा प्रवासाचे अनुभव कथन केले. २०२२ च्या मधील १०० मीटर अडथळा शर्यतीत भारतीय अंडर-२० राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यापासून ते आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. विशेषतः २०२५ च्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून त्यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर फडकवला होता. ‘खेलो इंडिया’सारख्या क्रांतिकारी उपक्रमांमुळे आजच्या युवा खेळाडूंना आपली उपजत क्रीडा गुणवत्ता ओळखण्याची, ती योग्य प्रकारे विकसित करण्याची आणि उच्च स्तरावर पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळत असल्याचे त्यांनी गौरवाने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या सर्वसमावेशक व सर्वांगीण सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘नशामुक्त आयआयटी मुंबई’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेवर भर देत विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या तरुण पिढीने कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या आणि घातक व्यसनांच्या आहारी न जाता त्यापासून काटेकोरपणे दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. युवकांचा सर्वांगीण, बौद्धिक व शारीरिक विकास साधण्यासाठी निरोगी, शिस्तबद्ध आणि उत्पादक जीवनशैली असणे काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी या अभियानाचे नेतृत्व करत ‘नशामुक्त समाजाचे दूत’ बनण्याचे आवाहन त्यांनी केले. या विशेष सत्रादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी आणि युवकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्यासह एक निरोगी, सक्षम आणि पूर्णपणे नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी खारीचा का होईना वाटा उचलण्याचा दृढ संकल्प सगळ्यांनी केला. यानंतर संचालक प्रा. शिरीष केदारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये दर्जेदार क्रीडा परिसंस्थेचा विकास करण्यावर आणि विद्यार्थ्यांचा क्रीडा व शारीरिक उपक्रमांमधील सहभाग सातत्याने वाढवण्यावर भर दिला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक सुकर होईल.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई

Latest News

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका
ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software