ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा

अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वी राजकीय खळबळ. 'ओबीसींच्या नादाला लागू नका', विजय वडेट्टीवारांचा आक्रमक इशारा.

मुंबई: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी चलबिचलू सुरू झाली आहे. अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट शब्दांत इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या वाट्याला कोणीही धक्का लावू नये, असे स्पष्ट करत "जरांगेंच्या नादाला लागायचं ते ज्याचं त्याचं, मात्र ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये," अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.

       मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणीशी संबंधित विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने तीन मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, परंतु जरांगे आपल्या मागण्यांवर अचल राहिल्याने हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि आंदोलकांवर निशाणा साधला. जर सरकारला आरक्षण द्यायचेच असेल, तर त्यांनी त्यासाठी अन्य कोणताही मार्ग काढावा, पण मागासवर्गीय ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अनेक मराठा नेत्यांकडे स्वतःकडेच ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला, मात्र सध्याचे संवेदनशील वातावरण पाहता आपण सध्यातरी नावे जाहीर करणार नसल्याचे सांगत योग्य वेळी सर्व खुलासे करू, असा इशाराही त्यांनी दिला.

        दुसरीकडे, या राजकीय घडामोडींमध्ये इतर पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भाजपचे तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहांगडाले यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तीव्र टीका केली आहे. जरांगे यांचे आंदोलन समाजकारणासाठी नसून स्वतःचा राजकीय स्वार्थ आणि स्वतःचे नाव मोठे करण्यासाठीचा खटाटोप असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांचे संपूर्ण आंदोलन केवळ विशिष्ट पक्षाच्या आणि विशेषतः भाजप नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका करण्यापूर्तेच मर्यादित राहिल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे राजकीय टीका-टिप्पणी सुरू असतानाच, दुसरीकडे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी स्वतः अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. उपोषणाच्या तोंडावर झालेल्या या भेटीला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, या बैठकी मागील नेमकी चर्चा काय, याची उत्सुकता सर्वत्र लागली आहे.

       मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावर ओबीसी नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे आगामी काळात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांसमोर पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जरांगे यांच्या उपोषणाची सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकार नेमकी कोणती पावले उचलणार आणि यावर काय तोडगा काढणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई

Latest News

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका
ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software