न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी मोठा दिलासा; वकिलीचा अनुभव आता १ वर्षच

MPSC च्या CJJD व JMFC पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर MPSC अर्जात सुधारणा.

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विधी आणि न्यायिक सेवा परीक्षांच्या (JMFC CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रते मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा दायक बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिलेल्या निर्देशा नुसार, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असणारा वकिलीचा (Law Practice) अनुभव तीन वर्षांवरून थेट एक वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने, सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतही आवश्यक सुधारणा करण्यात आली असून, विधी सेवा पूर्व प्रशिक्षण योजने साठी आता तीन वर्षांऐवजी केवळ एक वर्षाचा वकिली अनुभव असलेला तरुण कायदे पदवीधर पात्र ठरणार आहे.

       महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणाच्या अंतर्गत वर्ष २०२६-२७ करिता टीआरटीआय (TRTI), बार्टी (BARTI), सारथी (SARTHI), अमृत (AMRIT) आणि आर्टी (ARTTI) या स्वायत्त संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ चे आयोजन केले जात असून, या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया गत ९ ऑगस्ट २०२६ पासून अधिकृत पणे सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशानंतर अर्ज प्रक्रियेच्या नियमात तातडीने सुधारणा करण्यात आल्याने, अनेक होतकरू तरुण वकिलांना या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

      या सुधारित बदलामुळे कायद्याची पदवी पूर्ण करून न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या तरुण वकिलांना न्यायिक सेवा परीक्षांच्या दर्जेदार तयारी साठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या लक्षित गटातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक उमेदवारांनी या सुधारीत पात्रता निकषाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि विहित मुदतीत आपला ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंमलबजावणी व समन्वय समितीचे अध्यक्ष तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (आसंप्रसं), पुणेचे आयुक्त निलेश सागर (भा.प्र.से.) यांनी केले आहे. परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू असल्याने इच्छुकांनी कोणतीही दिरंगाई न करता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई

Latest News

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका
ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software