अभिनेता आशिष कपूरला अटक

     अनेक हिट हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिकांमधून प्रसिद्ध असलेले टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूर यांना बलात्काराच्या आरोपाखाली पुण्यात अटक करण्यात आली आहे. आशिष हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा आहे आणि त्याने वो अपना सा , बंदिनी, लव्ह मॅरेज या अरेंज्ड मॅरेज, देखा एक ख्वाब, मोलकी रिश्तों की अग्निपरीक्षा, चांद छुपा बदल में, ...सरस्वतीचंद्र आणि ये रिश्ता क्या कहलाता है यासह अनेक दैनिक सोपमध्ये काम केले आहे.

आशिषने ऑगस्टच्या सुरुवातीला दिल्लीतील त्याच्या मित्राच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान पार्टी मध्ये एका महिलेला आशिष बाथरूम मध्ये घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार  महिलेने केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत एका घरगुती पार्टीदरम्यान बाथरूममध्ये आशिषने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकारणी ११ ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या मूळ तक्रारीत आशिषसह इतर अज्ञात व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख होता. तथापि, तिने नंतर तिचे म्हणणे बदलले, इतरांचे संदर्भ काढून टाकले आणि फक्त आशिषवर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software