- Hindi News
- सातारा
- कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
.jpg)
सातारा: फलोद्यान क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. उत्पादन, काढणीत्तोर हाताळणी, प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करुन त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे तसेच ड्रॅगनफ्रूट, अव्हेंकेंडो, ब्लुबेरी अशा नवनविन पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्र विस्तार घटकांतर्गत लागवडीस अनुदान यासाठी कृषि विभागामार्फत कृषि समुद्धी योजना सन २०२५-२६ मध्ये राबविली जाणार आहे.
कृषि समुद्धी योजनेमधून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सदर योजनांच्या माध्यमातून फार्मगेट पॅकहाऊस - ४४८. प्राथमिक फिरते प्रक्रिया केंद्र १०, शितगृह ३, शितवाहन - २५. शीतखोली- २५. याशिवाय फलोत्पादन यांत्रीकीकरण घटकांतर्गत मजूर टंचाईवर मात करणेसाठी ट्रॅक्टर ४३०, पॉवर टिलर ४१०, इतर औजारे प्लस्टिक अस्तरीकरण २४२, हरीतगृह उभारणी ४६, कांदा चाळ - ४७९, क्षेत्र विस्तार घटकांतर्गत आले व २२९, मधुमक्षिका पालन ६७, आळिंबी उत्पादन केंद्र उपरोक्त बाबींचा लाभ देणेत येणार आहे. ४४८, तसेच, सामुहिक तलाव ५०, शेततळे शेडनेट हाऊस ७३, प्लास्टीक मल्चिंग ६२, हळद पिक लागवड, ड्रॅगन फ्रूट, ब्ल्यु बेरी, -२५, अशा एकुण अंदाजित ३१८५ लाभार्थ्यांना उपरोक्त बाबींचा लाभ देण्यात येणार आहे.
उपरोक्त घटकांचा लाभ घेणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. तसेच ऑनलाईन अर्ज करणेकरीता जवळील QR Code स्कॅन करून अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयास संपर्क साधावा. योजनेतून सर्वसाधारण, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतक-यांचे अर्ज सादर करणेकरीता दि. १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पंधरवडा मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाग्यश्री फरांदे यांनी केले केले आहे.