पुण्यातील आमदार बापू पठारे यांना मारहाण

     पुण्यातील एका आमदाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण करण्यात आली. लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.आमदार पठारे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत.शनिवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला. या प्रकरणानंतर वडगावशेरी मतदारसंघात खळबळ उडाली आहे. 
         पुणे महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून बापूसाहेब पठारे यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यानंतर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने महाविकास आघाडीकडून विधानसभेचे तिकीट दिले होते. महायुती उमेदवाराचा पराभव करत त्यांनी विजय मिळविला. 
लोहगाव येथील कार्यक्रमावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) गटामधील काही कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. आमदार पठारे यांना काही लोकांनी मारहाण केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. विद्यमान आमदारांना झालेल्या या मारहाणीमुळे येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software