तिमाही विवरणपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन

सातारा: सातारा जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यांची तीमाही विवरणपत्रे (इआर १) पुरुष, स्त्री, एकुण अशी या कार्यालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करावीत. विहीत मुदतीत ऑनलाईन विवरणपत्र सादर न केल्यास कायद्यातील कलम 5(१) व ५(२) नुसार उल्लंघन होवु शकते. तरी जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी कौशल्य विकास   रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर आपल्या कार्यालयामध्ये ३० सप्टेंबर  अखेर कार्यरत मनुष्यबळाची पुरुष, स्त्री, एकूण अशी तिमाही विवरणपत्र आपल्या युजर आयडी व पासवर्डसह ३१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुन‍िल पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर कार्यालयाशी संपर्क साधावा.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software