- Hindi News
- सातारा
- अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या नवउदयोजकांना मार्जिन मनी लाभ घेण्यासाठी आवाहन
अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या नवउदयोजकांना मार्जिन मनी लाभ घेण्यासाठी आवाहन

सातारा: केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टैंड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. सदर योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउदयोजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउदयोजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येते.या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउदयोजकांनी घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा येथे संपर्क साधावा.