जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारींची  विशेष तपास पथकामार्फत चौकशी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


नागपूर: जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित विभागातील अधिकारी सुनील कुशिरे यांची वाल्मी या संस्थेत बदली करण्यात आली असून २००८ ते २०१४ या कालावधीतील प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात विधान परिषद सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सदस्य ॲड. अनिल परब यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला.

        या बाबत अधिक माहिती देताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, मे. वॉटरफ्रंन्ट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने निविदा भरताना वाहनाची खोटी शपथपत्रे व इतर बनावट कागदपत्रे, आरसी बुक दाखल केलेली होती. विभागामार्फत रत्नागिरी शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. सद्यस्थितीत पोलीस तपासाअंती कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आले आहे. या कंपनीच्या २००८ ते २०१४ या कालावधीतील राज्यातील प्रकल्पांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरु आहे. या कंपनीला मंजूर करण्यात आलेल्या मौजे सारंगवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा संग्राहक तलाव व पुरसंरक्षक योजनांच्या प्रकल्पाची कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रण विभाग, अकोला यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली असून बहुतांश घटकांची कामे सर्वसाधारणपणे योग्य प्रकारे करण्यात आल्याचे दिसून आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी

Latest News

रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी
      राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली
म्हसवड येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय 
मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्यावी- पोलीस अधीक्षक तुषार दोषी
शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बॅंकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software