- Hindi News
- सातारा
- मलवडी मध्ये येळकोट येळकोट चा गजर; भंडारा खोबरे यांची उधळण करीत खंडोबाची यात्रा संपन्न
मलवडी मध्ये येळकोट येळकोट चा गजर; भंडारा खोबरे यांची उधळण करीत खंडोबाची यात्रा संपन्न
By Lokprant
On
दहिवडी: येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत मलवडी तालुका माण येथील खंडोबा देवाचा रथ उत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला. सुरुवातीला सकाळी साडेअकरा वाजता श्री खंडोबाची आरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे त्यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे महंत परमपूज्य शांतिगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. दुपारी सव्वा बारा वाजता श्री चा रथ गाव प्रदक्षणासाठी निघाला परकंदी रोड मार्गे दहिवडी रस्ता व मुख्य रस्त्याने एसटी स्टँड परिसरात आला. यावेळी हजारो भाविकांनी खोबरे आणि भंडारीची उधळण केली. यावेळी खंडोबा व महालक्ष्मी असे दोन रथ तसेच सासनकाठी मानाच्या पालख्या निघाल्या होत्या. याच्यापुढे बँड पथक लोकनृत्य डॉल्बी लावण्यात आला होता. त्यानंतर रथ स्टॅन्ड पासून हायस्कूलच्या पाठीमागून प्रदक्षिणेसाठी निघाला. यावेळी रथावर नारळ तसेच नोटाचे देणगी स्वरूपात लोकांनी भक्तिमय वातावरणात अर्पण केले. तसेच खोबरे व भंडारा याची उधळण केली. यावेळी रथासोबत मलवडी नवलेवाडी येथील ग्रामस्थ मानकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
देव दिपाली पासून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले सुरुवातीला हळदी समारंभ, त्यानंतर लग्न समारंभ, भरीत रोडग्याचा नैवेद्य यासारखे कार्यक्रम घेण्यात आले
यात्रेच्या निमित्ताने क्रिकेटचे सामने , जागरण पार्टी, भेदिक गाणी, जनावरांचे प्रदर्शन कुस्त्यांचा आखाडा, यासारखे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये जास्त वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर वाहन तळ उभारण्यात आला होता महामंडळाच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. गावामध्ये लोकांना व्यवस्थितपणे यात्रा करता आली तसेच वाहतुकीची कोंडी आवरण्यात प्रशासनाला यश आले. यात्रेच्या निमित्ताने मिठाईची व खास करून जिलेबीची दुकाने मोठ्या प्रमाणात आले आहेत पाळणे त्याचबरोबर मनोरंजनाची साधने आली असून लोकांनी याकडे मोठी गर्दी केली होती.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
Latest News
15 Dec 2025 12:46:52
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली
