- Hindi News
- पुणे
- घायवळ टोळीचा सदस्य पोलिसांच्या हाती; 200 काडतूसे केली जप्त
घायवळ टोळीचा सदस्य पोलिसांच्या हाती; 200 काडतूसे केली जप्त
पुणे: पुण्यात अनेक गुन्हेगारांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. सराईत गुन्हेगार, कोयता गॅंग अशा अनेकांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच निलेश घायवळ टोळीतील एका सदस्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 200 जिवंत काडतूसे आणि 200 रिकामी काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. निलेश घायवळ टोळीतील संशयित सदस्य अजय सरोदे (वय 35) याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये दोन हत्येच्या प्रयत्ना संदर्भात गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी त्याचा तपास सुरू होता, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. या प्रकरणी अजय सरोदे याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून 200 जिवंत व 200 रिकामी काडतूसे सापडली.
पोलिसांना तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ही काडतूसे गेल्या काही महिन्यात अहिल्यानगर येथील लोणावळा आणि सोनेगाव येथील फार्महाऊस मध्ये सराव शूटिंगसाठी वापरली जात होती. पोलीस उपयुक्त झोन 3 चे संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सरोदे विरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अतिरिक्त एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.18 सप्टेंबर रोजी घायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूड पोलीस स्टेशन जवळ एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर बिलहूक वापरून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या प्रकरणी त्यांचा तपास सुरू होता. अजय सरोदे हा 2011 पासून घायवळ टोळीशी संबंधित आहे असे चौकशी दरम्यान समोर आले आहे.
