- Hindi News
- सातारा
- म्हसवड येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
म्हसवड येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
दहिवडी: टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र, टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा, टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाच्या महासचिव, मिनाक्षी गिरी मॅडम, तसेच महाराष्ट्र सहसचिव चंद्रकांत तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वी,19 वर्षाखालील मुले व मुली अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 17 ते 20 डिसेंबर दरम्यान म्हसवड ता. माण या ठिकाणी आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून साधारण मुलांचे 30 व मुलींचे 10 संघ,साधारण 450 खेळाडू, 20 पंच, 15 पदाधिकारी,उपस्थित राहणार आहेत, या स्पर्धेसाठी 3 मैदान तयार केली असून या स्पर्धा यूट्यूब लाईव्ह दिसणार असून, उद्घाटनाचा सामना पोलीस व पत्रकार या दोन संघांमध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था अतिशय छान करण्यात आली आहे, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माण तालुका अध्यक्ष विकास सरतापे, सचिव महेश सोनवले, खटाव तालूका अध्यक्ष ऍड.बाबा शिंदे, सचिव विशाल निकम परिश्रम घेत आहेत.
