- Hindi News
- पुणे
- लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीचा प्रियकराने घेतला फायदा; मारहाण करून दिला लग्नाला नकार
लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीचा प्रियकराने घेतला फायदा; मारहाण करून दिला लग्नाला नकार
राज्यात विवाहित, अविवाहित मुलींच्या फसवणूकीच्या घटना आपल्याला दररोज पाहायला मिळत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप हा आत्ताच्या पिढीसाठी हानिकारक आहे. अशीच एका लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व नंतर लग्नाला नकार दिला. तिला मारहाण देखील केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी संबंधित तरुणास अटक केली आहे. श्रीकांत बाळासाहेब शिंदे वय 25 रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. ते दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. येथेच त्यांची एकमेकांशी ओळख झाली. हा सर्व प्रकार 22 एप्रिल 2024 पासून 3 डिसेंबर पर्यंत सुरु होता. त्या दोघांनी चंदन नगर मध्ये लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तरुणाने तिला अनेक वेळा लोणीकंद येथील लॉज वर नेले. तिचा विश्वास संपादन केला. तिने लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला व तिला मारहाण देखील केली. शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरुणीने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पुढील तपास सुरु आहे.
