पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघातील प्रारुप मतदार  याद्या प्रसिद्ध

सातारा: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अनुषंगाने दिनांक १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम मा. विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे तथा मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक व पदवीधर मतदार संघ यांचेमार्फत दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मा जिल्हाधिकारी सातारा व २६२ सातारा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी सातारा हे सहा मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांचे देखरेखीखाली सातारा तालुक्यासाठी खालील ६ पदनिर्देशित अधिकारी यांचेमार्फत दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त अर्जाचे छाननी करण्यात येवून सातारा तालुक्यातील पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भाग क्र ३०५ ते ३२९ तसेच शिक्षक मतदार संघाची यादी भाग क्र. २११ ते २१७ ची प्रारूप मतदार यादी दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी तहसिलदार सातारा व मा. उपविभागीय अधिकारी सातारा, मुख्याधिकारी सातारा नगरपरिषद, व गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा यांचे नोटीस बोर्डावर, व सर्व संबंधित मतदान केंद्रावर आज रोजी रितसर प्रसिध्द करण्यात आलेली आहे तरी प्रस्तुत प्रसिध्द केलेली प्रारूप मतदार यादी ची पाहणी करून संबंधित मतदाराने आपल्या नावाची खात्री करावी व याउपरही नावामध्ये हरकत दुरूस्ती अथवा नव्याने नोंदणी करावयाची असल्यास विहीत नमुन्यातील फॉर्म नं अनुक्रमे फॉर्म नं ७,८ व १८,१९  भरून संबंधित पदनिर्देशित अधिकारी अथवा निवडणुक शाखा तहसिल कार्यालय सातारा येथे दिनांक १८ डिसेंबर २०२५  पर्यंत हरकती व दावे स्विकारण्यात येतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आशिष बारकुल,  सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा व समीर यादव पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदार सातारा यांनी केले आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी

Latest News

रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी
      राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली
म्हसवड येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय 
मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्यावी- पोलीस अधीक्षक तुषार दोषी
शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बॅंकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software