हिंजवडीत बस अपघातात 3 जण ठार तर 5 जण जखमी

शाळेतून घरी परतत असताना बसने तीन भावंडांना चिरडले

      पुण्यात रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत वाढले असून नवले ब्रिज, येरवडा, वाघोली त्यानंतर आता हिंजवडी मध्ये देखील भीषण अपघात झाला आहे. एका खाजगी कंपनीच्या बसने धडक दिल्याने सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. प्रिया देवेन प्रसाद (वय 16 वर्ष) तिचा धाकटा भाऊ सुरज (6 वर्ष) आणि बहीण अर्चना (9 वर्ष) हे दोघेही या अपघातात जागीच ठार झाले होते. सोमवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास प्रिया तिच्या लहान भावंडांना शाळेतून घेण्यासाठी घरी परतत असताना हा अपघात झाला. तसेच यामध्ये मोटारसायकल चालक अविनाश चव्हाण (२६) आणि नूर आलम आणि विमल ओझरकर (४०) या दोन पादचाऱ्यांसह तिघे जण जखमी झाले. चव्हाण यांच्यावर ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे हिंजवडी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी बस चालक नागनाथ गुजर याला अटक केली आहे.             

       मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक हा दारू पिऊन बस चालवत असल्याचे आढळून आले. अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी चालकाला बेदम मारहाण देखील केली होती. ही बस आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघाली होती. अपघातात जखमी झालेल्या प्रियाला  तिचे वडील देवयानी प्रसाद यांनी तिला प्रथम औंध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर ससून रुग्णालयात नेले. जेथे रात्री उशिरा तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे हिंजवडी पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक विकास ताकतोडे यांनी सांगितले. 

  हाती आलेल्या माहितीनुसार, मद्यप्राशन केलेल्या बस चालकाने रस्त्यालगचा इलेक्ट्रिक डीपीचे आणि होर्डिंगचे देखील नुकसान केले आहे. मंगळवारी हिंजवडी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी TOI ला सांगितले की त्यांनी ट्रान्सपोर्ट ऑपरेटरचे सब वेंडर कम मॅनेजर भाऊसाहेब घोलम यांनाही देखील अटक केली आहे. पोलिसांनी गुजर,घोलम, वाहतूक संचालक व्यवस्थापक आणि गाडी चालकाला चालवण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याची तंदुरुस्ती  तपासण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. बस चालक गुजर आणि मॅनेजर घोलम यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली," असे पांढरे म्हणाले. 

 

 

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी

Latest News

रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी
      राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली
म्हसवड येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय 
मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्यावी- पोलीस अधीक्षक तुषार दोषी
शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बॅंकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software