महाविद्यालयीन युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन 

 आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल  यासारख्या आपत्कालीन  क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास युवकांद्वारे रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी  'MY भारत' पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

            केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने, केंद्रीय मंत्री  डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना NSS पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन  बैठक पार पडली. यावेळी राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर नोंदणी सुरू आहे.  नोंदणी करताना विद्यार्थी आठवड्यातून किती दिवस आणि किती तास सेवा देऊ इच्छितात हे देखील नमूद करू शकतात. ही नोंदणी जिल्हा स्तरावर केली जाणार असून, संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाशी शेअर केली जाणार आहे. आपत्तीकालीन  किंवा युद्धजन्य परिस्थितीत या  सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्सची मदत घेता येणार आहे. देशासाठी उभे रहा सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय 

Latest News

आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय  आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय 
दहिवडी: सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या मिरवणूकीतील डिजे यापुढे आंधळी गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला. ध्वनी प्रदुषण,...
मानवी हक्कांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्यावी- पोलीस अधीक्षक तुषार दोषी
शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बॅंकांनी तातडीने वित्त पुरवठा करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील
महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न - महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती देण्यात येणार; निधी उपलब्धेकरीता प्रस्ताव शिखर समितीकडे - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software