- Hindi News
- सातारा
- कराड येथील महामार्गवर बसचा भीषण अपघात...नाशिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बस कोसळली
कराड येथील महामार्गवर बसचा भीषण अपघात...नाशिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बस कोसळली
सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यांचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी सोबत अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यातच कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करत होते, या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पुणे- बँगलोर महामार्गाचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. कराड कोल्हापूर मार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. रस्ते अरुंद असल्याने चालकाचा ताबा सुटून सहलीची बस उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात पडली. यामध्ये चालकासह ५० विद्यार्थी, २ शिक्षक व ४ आचारी असे ५७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघाता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार ता कराड गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील पी बी पाटील महाविद्यालया ची बस (क्रमांक एम एच ०४ जे पी ०९२० मधून ५० विद्यार्थ्यांसह २ शिक्षक व ४ आचारी असे ५७ जण नाशिक वरून मालवणला सहलीसाठी गेले होते. सहलीवरून परतत असताना हा भीषण अपघातात झाला. या अपघातात चालकासह ५० विद्यार्थी, २ शिक्षक व ४ आचारी असे ५७ जण जखमी झाले आहेत. अपघात होताच अपघात स्थळी एकच गोंधळ उडाला होता. वाठार ता कराड गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतीचा हात पुढे केला.तसेच अपघाताची माहिती पोलिसासह महामार्ग पोलीस व देखभाल विभागाला दिली. अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, प्रशांत जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने अपघात स्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी जखमी विद्यार्थ्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० जणांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद घेण्याचे काम कराड तालुका पोलिसांच्या वतीने सुरू आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी हॉस्पिटलमध्ये तात्काळ जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांबाबत सर्व आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
