भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा

     देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, "आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी" ते तात्काळ प्रभावाने पद सोडत आहेत.
"आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ प्रभावीपणे भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे," असे त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
      जगदीप धनखड २०२२ पासून भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम करत होते . त्यांनी यापूर्वी २०१९ ते २०२२ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. जगदीप धनकड हे 
राज्यसभेचे अध्यक्ष होते. त्यांचे वय ७४ वर्ष असून त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा राजीनामा आला.

जाणून घेऊया उपराष्ट्रपती पदाबद्दल 

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे.संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. 11 ऑगस्ट 2022 मध्ये जगदीप धनकड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.

  जगदीप धनखड यांनी लिहलेल्या पत्रात ते काय म्हणाले?
जगदीप धनखड यांनी एका पत्रात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसद सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
"आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अमूल्य अनुभवांबद्दल आणि अंतर्दृष्टीबद्दल मी मनापासून आभारी आहे. या महत्त्वपूर्ण काळात भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व घातांकीय विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे हा एक विशेषाधिकार आणि समाधान आहे. आपल्या देशाच्या इतिहासाच्या या परिवर्तनीय युगात सेवा करणे हा खरा सन्मान आहे," असे धनखड यांच्या पत्रात पुढे म्हटले आहे.
धनखर म्हणाले की, ते पद सोडताना, " भारताच्या जागतिक उदय आणि अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांना अभिमान आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर त्यांचा अढळ विश्वास आहे."

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग

Latest News

कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...
वेदावती हायस्कूलच्या  मैदानाची त्रिमुर्ती उद्योग समूहाकडून  स्वच्छता 
बिजवडी केंद्रातील सर्व शाळांचे वारुगड दर्शन  विद्यार्थ्यांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद
नोरा फतेही सारखी फिगर हवी म्हणून बायकोला तासंतास करायला लावली जीम.... बायकोचे झाले हे हाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software