- Hindi News
- देश
- शाहरुख खानला ३३ वर्षांनंतर 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाह...
शाहरुख खानला ३३ वर्षांनंतर 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

गेल्या तीन दशकात शाहरुख खानने अनेक हिट चित्रपट दिले. अखेर त्याला 2023 च्या जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. 1992 मध्ये दिवाना या चित्रपटातुन शाहरुख खान ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक सुप्रसिद्ध चित्रपट दिले. चक दे इंडिया, स्वदेश, पठाण, डंकी अशा अनेक चित्रपटांचे जागतिक स्तरावर कौतुक करण्यात आले.
71 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये शाहरुख खानला अखेर तेहतीस वर्षानंतर जवान चित्रपटासाठी सन्मान मिळाला आहे. त्याचे काम अभिनय लोकप्रियता आणि भारतीय चित्र पटसृष्टीवरील प्रभाव लक्षात घेता हा पुरस्कार त्याच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा क्षण असणार आहे. पण जवान या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला हा पुरस्कार देण्यापेक्षा स्वदेश किंवा चक दे इंडिया अशा उत्तम चित्रपटांना जर हा पुरस्कार दिला असता तर जास्त आनंद झाला असता असं मत अनेकांनी एक्स वर व्यक्त केले आहे. यामध्ये देशातील त्याच्या फॅन्स सोबत पर राष्ट्रीय फॅन्स चा देखील समावेश आहे.