US-Iran War: अमेरिकेच्या ‘हिमार्स’ क्षमतेचा इराणवर मोठा्र प्रहार; मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा तीव्र

अमेरिकेने इराणविरोधात 'हिमार्स' क्षेपणास्त्रांचा वापर करत मोठे हल्ले केले. इराणचा अमेरिकेशी बोलणी करण्यास नकार, मध्यपूर्वेतील तणाव वाढला.

वॉशिंग्टन: मध्यपूर्वेतील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील चर्चा आणि वाटाघाटींचे मार्ग पूर्णपणे बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा भीषण युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिकेने इराणच्या विरोधात पहिल्यांदाच आपल्या अत्याधुनिक हिमार्स’ (HIMARS) क्षेपणास्त्रांचा वापर करत मोठे हल्ले चढवले आहेत, ज्यामुळे इराणमधील अनेक शहरांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेशी झालेल्या करारांनंतरही वारंवार हल्ले होत असल्याने आणि अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नसल्याची भूमिका घेत इराणने आता कोणतीही बोलणी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शांततेच्या चर्चेचा बडगा दाखवून अमेरिका केवळ वेळेचा अपव्यय करत असल्याचा आणि गाफील असताना पुन्हा हल्ले करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. आखातातील अमेरिकेच्या सामरिक ठिकाणांवर इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक धोरण अवलंबत आपल्या लष्करी कारवाईला अधिकच तीव्र केले आहे.

या नवीन संघर्षामध्ये अमेरिकेने केवळ जमिनीवरून मारा करणाऱ्या यंत्रणाच नव्हे, तर पहिल्यांदाच ‘हिमार्स’ मिसाईल सिस्टीमचा प्रभावी वापर केला आहे. याशिवाय अत्याधुनिक लढाऊ विमाने, लांब पल्ल्याचे ड्रोन्स आणि समुद्रातील युद्धनौकांवरून अत्यंत अचूकपणे लक्ष्य भेदणाऱ्या शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याची कबुली स्वतः अमेरिकन सैन्याने दिली आहे. या तीव्र हल्ल्यांमध्ये इराणच्या अनेक महत्त्वपूर्ण लष्करी तळांना आणि सामरिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस

Latest News

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस
घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन. ३०० कोटींची तरतूद, जुलै २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य.
शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार: मंत्री प्रकाश आबिटकर
भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर मांडण्याची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नेपाळ हिंदू राष्ट्र झाल्यास राजेशाही परत येईल; पंतप्रधान बालेन शाह यांची भीती
मिरा-भाईंदरमध्ये लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software