मोक्काच्या आरोपीचा चार वर्षांनंतर पर्दाफाश; वेशांतर करून पुणे गुन्हे शाखेची कर्नाटकात कारवाई

पुणे गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाई. चहा विक्रेता व मेकॅनिकचे वेशांतर करून ४ वर्षांपासून फरार मोक्का आरोपी मोईनुद्दीन शेखला बेळगावात अटक.

पुणे: खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देणारा कुख्यात आरोपी अखेर पुणे शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि बंगळुरू परिसरात अत्यंत नाट्यमय आणि जिगरबाज कारवाई करत मोईनुद्दीन जाफर शेख उर्फ मोईन कालू शेख (वय २८, रा. येरवडा, पुणे) याला बेड्या ठोकल्या आहेत. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनासह शस्त्र कायदा, खंडणी आणि मोक्का अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असून, तो यापूर्वी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर आणि सखोल तपास हाती घेतला होता. तपासा दरम्यान हा फरारी आरोपी कर्नाटक राज्यात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती युनिट-४ च्या पथकाला मिळाली. आरोपीला गांजा सेवन आणि विक्रीची जुनी सवय असून, याच व्यसनामुळे तो पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला. कर्नाटकातील मागील चार वर्षांच्या नोंदी तपासल्यानंतर, २०२४ मध्ये त्याच्याविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. आरोपी वारंवार आपले मोबाईल क्रमांक बदलत असल्यामुळे त्याचा नेमका माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते, परंतु तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तो थानागुंडी आणि बंगळुरू परिसरात वावरत असल्याचे निष्पन्न झाले.

       या सुगाव्याच्या आधारे ११ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक खाजगी वाहनाने बंगळुरूकडे रवाना झाले. आरोपी अतिशय सावध असल्यामुळे पोलिसांना ओळखता येऊ नये म्हणून पथकातील पोलिसांनी चक्क अफाट वेशांतर केले होते. पथकातील एक कर्मचारी चहा विक्रेता तर दुसरा मेकॅनिक बनून संबंधित परिसरात पाळत ठेवून होता. यादरम्यान, आरोपीला पोलिसांच्या उपस्थितीचा सुगावा लागल्याने तो कारवाईपूर्वीच तेथून पसार झाला. मात्र, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तो बंगळुरूहून बेळगावच्या दिशेने जात असल्याचे समजताच पुणे पोलिसांच्या पथकाने न थकता त्याचा पाठलाग सुरू ठेवला. सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता धावत्या वाहनात घाईगडबड न करता पथकाने अत्यंत संयमाने योग्य वेळेची प्रतीक्षा केली.

        अखेर बेळगाव येथे स्थानिक मालमारुती पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचण्यात आला आणि श्रीनगर चिल्ड्रेन गार्डन परिसरातून मोईनुद्दीन याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याची ओळख निश्चित झाल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या इतर सहकाऱ्यांचा आणि गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू आहे. ही धडक आणि यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, एकनाथ जोशी, तसेच अंमलदार अमजद शेख, तुषार खराडे, अनिकेत भोसले, जहांगिर पठाण आणि विठ्ठल वाव्हळ यांच्या पथकाने पार पाडली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जयकुमार गोरे यांच्या दहीवडीतील निवासस्थानी बाप्पा विराजमान; सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

Latest News

जयकुमार गोरे यांच्या दहीवडीतील निवासस्थानी बाप्पा विराजमान; सुख-समृद्धीसाठी प्रार्थना जयकुमार गोरे यांच्या दहीवडीतील निवासस्थानी बाप्पा विराजमान; सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी (दहीवडी) येथील निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना. राज्यातील शेतकरी व जनतेच्या समृद्धीसाठी प्रार्थना.
गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज; ६७ नैसर्गिक, ३८३ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार
नेपाळच्या वीजसंकटावर भारताचा दिलासा; जलप्रलयानंतर दररोज ६५४ मेगावॉट वीज पुरवठ्याला मंजुरी
जर्मनीतील हानाऊत दुमदुमला ‘गणपती बाप्पा मोरया’; भारतीय समुदायाने एकत्र साजरा केला गणेशोत्सव
भाजपला कल्याणमध्ये धक्का? गणपत गायकवाडांचे निकटवर्तीय अनंता पावशे शिंदेसेनेत

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software