जीवे मारण्याची धमकी देऊन तब्ब्ल 50 लाखांच्या खंडणीची मागणी

      पुण्यातील घोरपडी येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्याला मुंढवा पोलिसांनी अटक केले आहे. 
अनिकेत अनिल पावल (वय 24) रा. भीमनगर घोरपडी असे आरोपीचे नाव असून "तुमच्याकडे खूप पैसा आहे, 50 लाख रुपये दे" अन्यथा तुला ठार मरेन अशी धमकी देऊन त्याने एका व्यवसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधी तक्रार दाखल करणारे व्यक्ती लेबर कॉन्ट्रॅक्टर असून ते पुण्यातील घोरपडी परिसरात राहतात. 26 ते 29 जुलै दरम्यान फिर्यादीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून धमकीचे कॉल येत होते. त्यानंतर तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे मला 50 लाख रुपये दे अन्यथा तुला जीवे मारेन अशी धमकी देऊन आरोपी फिर्यादी वर पाळत ठेवत होता असे तक्रारी मध्ये म्हटले आहे. 
       मुंढवा पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीला अवघ्या 12 तासांत जेरबंद केले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मनोहर यांच्या सहपथकाने सुरु केला. दरम्यान आरोपी फिर्यादीला घोरपडीत भेटायला येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी स्वप्नील  रासकर आणि अक्षय धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून परिमंडळ पाचचे पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, सहायक निरीक्षक राजू मनोहर यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software