- Hindi News
- पुणे
- चालत्या बस मध्ये एका प्रवाशावर केले कोयत्याने सपासप वार
चालत्या बस मध्ये एका प्रवाशावर केले कोयत्याने सपासप वार

बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बस मध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास काटेवाडी येथे बस थांबल्यानंतर घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बस बारामतीहुन इंदापूरला निघाली होती. बस मध्ये अनेक प्रवासी असल्यामुळे हल्लेखोराकडे कोयता असल्याचे कोणाच्याच निदर्शनास आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि ज्यावर हल्ला झाला तो व्यक्ती बसच्या शेवटच्या सीट वर बसले होते त्यांच्यात कोणताही वाद झाला नाही परंतू अचानक त्यातील एकाने कोयत्याने बाजूच्या व्यक्तीच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यानंतर आरोपीने स्वतःवर देखील वार केले. संपूर्ण बस मध्ये रक्ताचे डाग पडले असून हा प्रकार काटेवाडी येथे घडला. बस थांबल्या नंतर जखमी व्यक्तीने रुग्णालयाकडे धाव घेतली. जखमी प्रवासी आणि हल्लेखोर यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला हेही उघड झाले नाही.

खबरें और भी हैं
शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
