आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित

दहिवडी:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित विशेष समारंभात माण तालुक्यातील बनगरवाडीचे सुपुत्र व पुण्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांना “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक भवन येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभाचे आयोजन धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

      डॉ. नितीन वाघमोडे यांनी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सोबतच शिक्षण, जलसंधारण, शेती, क्रीडा या क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे. समाज व मातीशी जोडलेली नाळ कायम ठेवत समाजाच्या उन्नतीसाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजकारण, प्रशासन, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, अधिकारीवर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software