आंधळी जि.प.शाळेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

दहिवडी: माण तालुक्यातील आंधळी जिल्हा परिषद‎ प्राथमिक केंद्र शाळेत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दि. २४ जुलै रोजी शाळेला आकस्मिक भेट दिली.‎ यावेळी थेट मुलांमध्ये मिसळून विद्यार्थी यांच्याशी हितगुज‎ करुन विद्यार्थी यांची गुणवत्ता‎ तपासली , मुलांशी सहज मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शाळेचे परिसर व मुलांची गुणवत्ता पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी समाधान व्यक्त केले. 
        यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थीकडून सातारा जिल्ह्याचा इतिहास व ओळख , गणित , इंग्रजी , सामान्य ज्ञान , मुलांचा संगणक चालवण्याचा अनुभव , वाचन‎ पाहून प्रशंसा‎ व्यक्त केली.‎ लोकसहभागातून शाळेचा‎ विकास झाला आहे . शाळेचा स्वच्छ व सुंदर परिसर पाहून आनंद व्यक्त‎ केला. विशेष म्हणजे मुलांनी न घाबरता प्रत्येक प्रश्नांची छान उत्तरे दिली. त्याचबरोबर मुलांनी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. 
          बालचमुचे विविध प्रश्न ऐकून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन खूप आनंदी झाल्या . पुढे त्यांनी मुलांना देखील तुम्ही मोठेपणी कोण होणार असे प्रश्न विचारले असता यावर त्या लहान मुलांनी कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी कलेक्टर, कोणी पोलीस ,कोणी आयपीएस, कोणी जबाबदार अधिकारी , अशी मुलांनी एकापाठोपाठ एक अशी उत्तरे दिली आणि हसत हसत त्यांनी प्रत्येक प्रश्नांतून गुणवत्ता तपासली.‌ 
         यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लहान मुलांनी वडीलधाऱ्या माणसांचे ऐकावे ,गुरुजनांच्या ऐकावे, छान अभ्यास करावा, खूप शिकून मोठे व्हावे, खूप ज्ञान मिळवावे , वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करावे, चिकित्सक राहावे , अशा प्रकारे छान संदेश दिला. सातारा जिल्ह्यामध्ये स्वच्छ- सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत व आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांचे कौतुक केले . गावाला चांगला सरपंच मिळाला की गावाचा विकास व कायापालट होतो. हे त्यांनी आवर्जून सांगितले 
         यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक घनश्याम काळे यांनी स्वागत केले. शाळेतील सर्व माहिती सांगितली. यावेळी पंचायत समिती माणचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे , गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे , माजी जि. प. सदस्य डी. एस . काळे, आंधळी गावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच दादासाहेब काळे, उपसरपंच सौ. खरात, हनुमंत जगताप, शाळेचे मुख्याध्यापक घनशाम काळे, जाधव सर, गोरे सर, सुप्रिया चिरमे मॅडम, माया वरकड मॅडम , पल्लवी गोरे मॅडम आणि सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software