- Hindi News
- सातारा
- कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु
कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

सातारा: शासकीय तंत्रनिकेतन, कराड संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी केंद्रीय प्रवेश फेरीव्दारे न भरलेल्या व संभाव्य रिक्त होणा-या जागांसाठी संस्थास्तरीय प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे. प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी 5 ऑगस्ट सायं ५ वाजेपर्यंत व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी संस्थेत प्रत्यक्ष अर्ज जमा करण्यासाठी कालावधी 7 ऑगस्ट 2025 असा आहे. शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे Civil, Computer, Electrical, Electronics & Telecommunication, Instrumentation, Mechanical, Mechatronics Engineering पदविका अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय वर्षातील रिक्त जागा व संस्था स्तरीय प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी http://www.gpk.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

खबरें और भी हैं
शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
