- Hindi News
- सातारा
- महसूल प्रशासना विरोधात १४ ऑगस्टला बेमुदत उपोषण व हलगीनाद आंदोलन
महसूल प्रशासना विरोधात १४ ऑगस्टला बेमुदत उपोषण व हलगीनाद आंदोलन
अवैध उत्खननाबाबत दादासाहेब चव्हाण करणार आंदोलन
By Lokprant
On

दहिवडी: खटाव तालुक्यातील मायणी ते शामगाव घाटममार्गे रस्त्याचे काम करणारी कंपनी सोनाई इन्फ्रा प्रा. लि. पुणे या कंपनीने मौजे म्हासुर्णे येथील आनंद शिवाजी माने यांच्या गटातून कोणत्याही प्रकारची महसूल प्रशासनाची पुर्वपरवानगी न घेता प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसिलदार बाई माने, मंडलाधिकारी, तलाठी यांना हाताशी धरून लाखों ब्रास मुरूम व दगड याचे अवैध उत्खनन केले आहे. तसेच माण तालूक्यातील मौजे राणंद, भालवडी येथूनही तात्पुरत्या परवान्याच्या नावाखाली लाखों ब्रास मुरूम व दगड याचे अवैध उत्खनन केले असून त्यांचे तात्काळ पंचनामे करून कंपनीवरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी मा. विभागीय आयुक्त तथा, पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत हलगीनाद आंदोलन व आमरण उपोषण करीत असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
By Lokprant

Latest News
02 Aug 2025 14:33:50
पुण्यातील खडकी परिसरातुन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनाच 4 जणांच्या टोळीने मारहाण केल्याची घटना