- Hindi News
- सातारा
- ९ आरोपींना १३ लाखाच्या मुद्देमालासह अटक दहिवडी पोलिसांची दमदार कामगिरी ; अट्टल चोरट्या टोळीचा केला प...
९ आरोपींना १३ लाखाच्या मुद्देमालासह अटक दहिवडी पोलिसांची दमदार कामगिरी ; अट्टल चोरट्या टोळीचा केला पर्दा फाश
By Lokprant
On

दहिवडी: माण तालुक्यातील दहिवडी व परिसरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रविण बापुराव चव्हाण, प्रशांत बापुराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, सुमीत रामचंद्र पाटोळे , अनिल नंदकुमार दळवी, मुकेश आबा अवघडे, सौरभ संतोष अवघडे, गोरख संजय चव्हाण,अजय आनंदा चव्हाण व एक विधीसंघर्ष बालक सर्व रा. दहिवडी ता.माण,जि.सातारा यांचा समावेश आहे
याबाबत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेली माहिती अशी की, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरी वरील , बोअरवेल वरील मोटार, केबल चोरी, तसेच शासकीय धान्य गोडावुन व जिल्हा परिषद शाळेतील तांदुळ व गॅस टाकी, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिरा जवळ असलेल्या तालीमीतील व्यायम शाळे मधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या.
या अनुषंगाने यामधील अज्ञात आरोपी यांचा दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे स्वतः त्यांच्या स्टाफसह शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या विहिरीवरील , बोरवेलवरील मोटार, केबल तसेच शासकीय धान्य गोडावुन व जिल्हा परिषद शाळेतील तांदुळ व गॅस सिलेंडर, दहिवडी येथील सिध्दनाथ मंदिरा जवळील तालीमीतील व्यायम शाळे मधील साहित्य चोरी मधील संशयित आरोपी यांची माहिती मिळाल्याने त्यांना दहिवडी पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ९ गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहे जप्त केली आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर,उपविभागीय पोलीस अधीकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उप निरीक्षक गुलाब दोलताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलिस हवालदार बापु खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांनी केलेली आहे.
अट्टल चोरट्या टोळीने दहिवडी परिसरातील शेतकरी व नागरिकांना अनेक दिवसापासून हैराण करून सोडले होते. या टोळीमुळे तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दहिवडी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून ९ जणांना अटक केल्यामुळे पोलिसांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
By Lokprant

Latest News
02 Aug 2025 14:33:50
पुण्यातील खडकी परिसरातुन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनाच 4 जणांच्या टोळीने मारहाण केल्याची घटना