- Hindi News
- सातारा
- शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

दहिवडी: सांगली जिल्ह्यातील मिरजचे शोएब खतीब लेखक व दिग्दर्शक बनला असून त्याने दिग्दर्शित केलेला ‘सूड शकारंभ’ चित्रपट तयार होवून अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाकडून मंजुरी मिळणार आहे. आयुष्याच्या विविध प्रवासातून प्रेरणा घेणारे आणि नवीन स्वप्न घेऊन शेवटी लेखक- दिग्दर्शक म्हणून काम करणारे शोएब खतीब यांचा प्रवास सुरू झाला शॅाट फिल्म आणि साँग अल्बम बनवण्यापासून. त्यानंतर त्यांनी अनेक प्रोडक्शन हाऊसेससाठी काम करताना अॅड इंडस्ट्री आणि मराठी मालिका यांच्या निर्मितीसाठी बराच काळ काम केले आहे. पण चित्रपट निर्मिती करण्याचे ध्येय घेवून काम करत असताना त्यांच्या आयुष्यात खूप चढ उतार आले. दोन ते तीन वर्ष ते या क्षेत्रापासून लांब राहिले, पण त्यांनी विश्वास आणि संयम सोडला नाही. त्यांनी आपल्या कल्पनांवर विश्वास ठेवून स्वतंत्रपणे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम म्हणजे, त्यांनी मराठी चित्रपट ‘सुड शकारंभ ’ लिहिला आणि त्याच दिग्दर्शनही केले. मराठी सिनेसृष्टीला पुढे जाण्यासाठी अशा तरुण आणि उत्साही दिग्दर्शकांची अगदी गरज आहे.


खबरें और भी हैं
शोएब खतीबचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
