दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखाताई पखाले 

दहिवडी: दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  दहिवडी नगरपंचायत चे कायमच वादग्रस्त ठरलेले व नेहमी चर्चेत असणारे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या चर्चांना उधाण आले होते, मात्र शेखर गोरे यांच्या पॅनल मधून बिनविरोध विजयी झालेल्या त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. दहिवडी नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये ही निवडणूक पार पडली. पिठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी काम पहिले.यावेळी नगराध्यक्षा निलम जाधव, मुख्याधिकारी संदीप घार्गे, नगरसेवक रुपेश मोरे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software