कोयनेचे ६ दरवाजे ६ फुटांवर; ३३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट

साताऱ्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे ६ दरवाजे ६ फुटांपर्यंत उचलले. कोयना नदीपात्रात ३३,८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग.

सातारा: कोयना धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सतत सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित राखण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्यात आली असून, आज (१ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांवरून थेट ६ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. या दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा (Flood Alert) इशारा देण्यात आला आहे.

जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, धरणाच्या सांडव्यावरून सध्या ३२,७७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याशिवाय, कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे (Powerhouse) एक युनिट सध्या कार्यरत असून, याद्वारे १,०५० क्युसेक पाणी पात्रात सोडले जात आहे. सांडवा आणि पायथा विद्युतगृह मिळून कोयना नदीत एकूण ३३,८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे की, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली, तर सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या सर्व गावांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नदीकाठावरील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software