नागपंचमी सणानिमित्त बिदाल येथे बैलाच्या तोरण मारण्याच्या भव्य स्पर्धा

दहिवडी:  नागपंचमी सणानिमित्त सलग 44 वर्ष आयोजित केल्या जात असणाऱ्या बिदाल तालुका माण येथील भव्य दिव्य अशा बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यती यावर्षी मंगळवार रोजी आयोजित केल्या असून प्रथम क्रमांकासाठी 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांक साठी 31 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 21 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे या स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणून बैलगाडी क्षेत्रातील सोन्या 50 - 50 व अक्रम हिंदकेसरी बकासुर हे दोन्ही नामवंत बैल उपस्थित असणार आहेत. 

       या स्पर्धेसाठी प्रवेश फी तीनशे रुपये ठेवण्यात आली आहे स्पर्धा सकाळी अकरा वाजता भैरवनाथ मंदिर बिदाल येते सुरू होईल, दुपारी दोन वाजता तोरण दुसऱ्या फेरीसाठी वर चढवले जाईल, तर तिसऱ्या फेरीसाठी सायंकाळी चार वाजता तोरण वर चढवले जाईल प्रथम क्रमांकासाठी तब्बल 15 फुटाची ट्रॉफी ठेवण्यात आली आहे या स्पर्धेसाठी समलोचक म्हणून माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनंजय जगदाळे व किशोर इंगवले हे काम पाहतील.  ही स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील हजारो लोक उपस्थित असतात त्याचबरोबर पै पाहुणे आवर्जून ही स्पर्धा पाहतात महाराष्ट्र राज्यात कोठेही नसणारी आगळीवेगळी अशी ही स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहत असतात अनेक वेळा याची लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. 
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software