गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा; ५,२२० जादा एसटी बसगाड्या धावणार

गणेशोत्सवासाठी ७ ते २५ सप्टेंबर दरम्यान कोकणात ५,२२० जादा एसटी बसेस धावणार. १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.

मुंबई: श्री गणरायाचे आगमन आगामी १४ सप्टेंबर रोजी होत असून, लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील लाखो कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवा निमित्त यंदा एसटी महामंडळाने ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ही घोषणा केली आहे.

    मंत्रालयात पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजना संदर्भातील आढावा बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे सर्व प्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी आणि संस्कृतीशी अत्यंत घट्ट जोडलेला सण आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा कोणताही विचार न करता कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर आहे. यंदा कोकणातील विविध मार्गांवर ५,२२० जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

    या विशेष जादा बसेसचे आगाऊ आरक्षण एसटी महामंडळाच्या npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना केवळ बसस्थानकांवरच नव्हे, तर ‘MSRTC Bus Reservation’ या अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेही घरबसल्या सहजतेने आरक्षण करता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीने ५,२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्यास भाविक व प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आगामी १० ऑगस्टपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी गट आरक्षणाची’ विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण म्हणजेच १०० टक्के भाडे सवलत लागू असणार आहे.

    आगामी ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे नियमित संचालन सुरू होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावरील एसटीची वाहतूक अतिशय सुरळीत पार पाडावी, यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर तातडीच्या मदतीसाठी आवश्यक त्या ठिकाणी विशेष वाहनदुरुस्ती पथके तैनात केली जाणार आहेत, जेणेकरून कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंडित सेवा प्रदान करता येईल.

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या

Latest News

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Brent Crude) किमतींमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव...
अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; पोलिसांशी हुज्जत प्रकरणी पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी
परदेशी निधीवर सरकारचा कडक अंकुश; ‘एफसीआरए सुधारणा विधेयक २०२६’ संसदेत मांडणार
भारताचा चीनला सणसणीत दणका! अरुणाचल सीमेजवळील २७ महत्त्वाची ठिकाणे अधिकृत भारतीय नकाशात समाविष्ट
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा; ५,२२० जादा एसटी बसगाड्या धावणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software