अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; पोलिसांशी हुज्जत प्रकरणी पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी CJP अध्यक्ष अभिजीत दीपके यांचे पोलीस संरक्षण हटवण्याची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी.

छत्रपती संभाजीनगर: दिल्लीतील गाजलेल्या जंतरमंतर आंदोलनानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थाना बाहेर कर्तव्यावरअसलेल्या पोलिसांशी त्यांची झालेली शाब्दिक चकमक आणि पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणी ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने’ आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले असून, अभिजीत दीपके यांना देण्यात आलेले शासकीय पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

     दिल्लीतील जंतरमंतर येथील यशस्वी आंदोलना नंतर अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी परतले असून, सध्या तिथेच सीजेपीची आगामी रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी राज्यभरातून अनेक नेते, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत. दरम्यान, या नागरिकांना भेटण्यापासून रोखण्यात येत असल्याचा आणि पोलीस उपस्थित राहूनही उद्धट वर्तन करत असल्याचा आरोप करत दीपके यांचा पोलिसांसोबत वाद झाला होता.

     या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दीपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला थेट जाब विचारत, “मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे पोलिसांनी ठरवायचे का?” अशी संतप्त विचारणा केली होती. तसेच ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याला “तुम्ही बाहेर जा” असे म्हणत निवास स्थानाच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचा दावाही या प्रकरणात करण्यात आला होता. एका शासकीय कर्मचाऱ्याला आणि पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारे सार्वजनिक रीत्या धारेवर धरल्यामुळे पोलीस दलामध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

    या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन’ने आक्रमक पाऊल उचलले आहे. कर्तव्य बजावत असताना पोलीस अधिकाऱ्याचा अपमान करणे आणि वर्दीचा अनादर करणे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे, असे संघटनेने म्हटले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अभिजीत दीपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तात्काळ मागे घ्यावे, तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही असोसिएशनने दिला आहे. या घडामोडींमुळे संभाजीनगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हे प्रकरण आगामी काळात आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिल्लीत मोदी-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा

Latest News

दिल्लीत मोदी-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा दिल्लीत मोदी-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा
नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात १ तास महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातील विकासप्रकल्प आणि राजकीय परिस्थितीवर आढावा.
पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या
अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; पोलिसांशी हुज्जत प्रकरणी पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी
परदेशी निधीवर सरकारचा कडक अंकुश; ‘एफसीआरए सुधारणा विधेयक २०२६’ संसदेत मांडणार
भारताचा चीनला सणसणीत दणका! अरुणाचल सीमेजवळील २७ महत्त्वाची ठिकाणे अधिकृत भारतीय नकाशात समाविष्ट

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software