बालविवाह रोखण्यासाठी लोक चळवळ उभारणार; अध्यक्ष संजय पुराणिक यांची घोषणा

बालविवाह रोखण्यासाठी लोकसहभागातून राज्यव्यापी चळवळ उभी करणार. बीड येथील बैठकीत बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांची घोषणा.

बीड: बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई करून चालणार नाही, तर लोक सहभागावर आधारित एक व्यापक राज्यव्यापी लोक चळवळ उभारण्यात येणार आहे. विशेषतः १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या सक्षमी करणावर भर देऊन बालविवाहांना आळा घालण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय विष्णू पुराणिक यांनी बीड येथे केली आहे. बीड येथे त्यांच्या अध्यक्षते खाली बाल हक्कांशी संबंधित विविध प्रकरणांची सुनावणी तसेच विविध प्रशासकीय विभागांची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

       या बैठकी दरम्यान बाल हक्कांशी संबंधित एकूण १९ प्रकरणांवर सविस्तर सुनावणी घेण्यात आली, त्यापैकी १० प्रकरणे जागेवरच यशस्वी रीत्या निकाली काढण्यात आली. उर्वरित प्रकरणांच्या संदर्भात संबंधित शासकीय विभागांना आवश्यक ते कडक निर्देश देत तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्यूअर” (प्रतिबंध हाच उपचारापेक्षा श्रेष्ठ) या मूळ तत्त्वानुसार भविष्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर गंभीर समस्या टाळण्यासाठी बालविवाह प्रत्यक्ष घडण्या पूर्वीच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याचा दृढ निर्धार आयोगाने व्यक्त केला आहे.

      या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी १२ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींचे सक्षमीकरण, जीवन कौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती, पालकांचे योग्य प्रबोधन, शाळा आणि महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग, ग्रामपंचायती, युवक मंडळे, विविध स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक प्रशासन यांच्या आपसी समन्वयातून एक राज्यव्यापी लोक सहभागाची चळवळ उभी केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या आढावा बैठकीत विविध विभागांमधील समन्वय अधिक बळकट करणे, बाल संरक्षणाशी संबंधित सर्व कल्याणकारी योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रत्येक गावात जन जागृतीची मोहीम वाढविण्यासाठी एक सर्व समावेशक संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला.

          या उच्चस्तरीय बैठकीस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या गीतांजली बालाजी बुट्टी, शुभांगी संजय तांबट, सदस्य संजय निळकंठराव लाखेपाटील, अतुल आनंदराव देसाई, प्रवीण संजाबराव भुजाडे, मिलन देवेंद्र जंगम तसेच आयोगाच्या प्रभारी सचिव वंदना जैन यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान

Latest News

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान
महाराष्ट्रात 'पशुधन विमा योजना' लागू. नैसर्गिक आपत्ती व रोगांमुळे पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण. विमा प्रीमियमवर ८५% शासन अनुदान.
नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत
राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पक्षाकडून मोठी जबाबदारी
संसदीय कोंडीवर तोडगा शोधण्याचे प्रयत्न; रिजिजूंची राहुल गांधीं सोबत दुसरी बैठक
जंतरमंतर आंदोलना नंतर सीजेपीमध्ये अंतर्गत कलह; अभिजित दीपकेंवर पक्ष पाताचा आरोप, मनीष ब्रह्मभट यांचा ठिय्या आंदोलन

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software